रेल्वेचे प्रकल्प वेळेत पूर्ण करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वेचे प्रकल्प वेळेत पूर्ण करा
रेल्वेचे प्रकल्प वेळेत पूर्ण करा

रेल्वेचे प्रकल्प वेळेत पूर्ण करा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी शुक्रवारी (ता. ११) कल्याण रेल्वे स्थानकाची, लोको शेडची पाहणी आणि यार्ड रीमॉडेलिंगच्या कामांचा आढावा घेतला आहे. तसेच यार्ड रीमॉडेलिंगच्या कामाला गती देऊन प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश अनिलकुमार लाहोटी यांनी उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांना दिले आहे. यावेळी मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल आणि इतर विभागांचे प्रमुख दौऱ्यात उपस्थित होते.
महाव्यवस्थापकांनी कल्याण रेल्वे स्थानकावरील स्टेशन व्यवस्थापक कार्यालय, आरपीएफ पोस्टची पाहणी केली. त्यांनी महिला, पुरुष आणि वातानुकूलित प्रतिक्षालय आणि इतर कार्यालयाच्या कामाच्या प्रगतीचीही पाहणी केली. अनिल कुमार लाहोटी यांनी प्रवाशांच्या विविध सुविधा, विकासकामांची पाहणी केली आणि प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती घेतली आहे. त्यानंतर महाव्यवस्थापकांनी इलेक्ट्रिक लोको शेड, कल्याणला भेट दिली. शेडमध्ये त्यांनी थ्री फेज टीएम असेंब्ली आणि डिजिटल रॉकवेल हार्डनेस टेस्टरचे उद्घाटन केले. त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. शेडचे वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता यांनी इलेक्ट्रिक लोको शेडची उत्क्रांती आणि बिघाड कमी करण्यासाठी अवलंबलेल्या विविध उपायांबद्दल सादरीकरण केले. त्यानंतर अनिलकुमार लाहोटी यांनी कल्याण येथील डिझेल लोको शेडला भेट देऊन प्रयोगशाळेची पाहणी केली. तसेच महाव्यवस्थापकांनी कल्याण गुड्स यार्ड रीमॉडेलिंगच्या कामांचाही आढावा घेतला. सर्व कामांना गती देऊन प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कल्याण ते इगतपुरीपर्यंत विंडो ट्रेलिंग निरीक्षणही त्यांनी केले.