अंधेरीत शाळकरी मुलांची ट्राफीक कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंधेरीत शाळकरी मुलांची ट्राफीक कोंडी
अंधेरीत शाळकरी मुलांची ट्राफीक कोंडी

अंधेरीत शाळकरी मुलांची ट्राफीक कोंडी

sakal_logo
By

अंधेरी, ता. ११ (बातमीदार) : अंधेरी पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा गोखले पूल बंद केल्यानंतर वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. याचा सर्वात जास्त फटका हा स्कूल बसला बसत आहे. संध्याकाळी ५ वाजता निघालेली बस तब्बल अडीच तास वाहतूक कोंडीत अडकली. वाहतूक कोंडी बघता या भागातील शाळा सुटण्याचे वेळापत्रक बदलवण्याची मागणी आता स्कूल बस संघटनेकडून होत आहे.

गोखले पूल बंद झाल्यामुळे शाळेची वेळ आणि वाहतूक यांचे नियोजन होत नाही. परिणामी अनेक शाळेच्या बस ट्रॉफिक वाहतूक कोंडीत अडकत आहेत. प्राथमिक शाळेची सुटण्याची वेळ संध्याकाळची आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने शाळांना ४ वाजेपर्यंत मुलांना सोडण्यास सांगावे, अशी मागणी स्कूल बस मालक संघटनेने केली आहे. गोखले पूल बंद झाल्यामुळे ट्रॉफिक जाममुळे शाळेच्या बसचे सर्व चालक, महिला वैतागल्या असून त्यांनी स्कूल बसमध्ये काम करणार नाही, असे सांगितले आहे. वाहतूक पोलिस वाकोला यांनीही शाळा बसचालकांना पार्ले पुलावरून बस जाऊ देण्यास मनाई केली आहे. त्यामुळे काय तो मार्ग काढावा, अशी आम्ही सरकारला विनंती करतो, असेही संघटनेकडून सांगण्यात आले आहे.
.....
आम्ही अंधेरी, वाकोला आणि वर्सोवा या वाहतूक नियंत्रकांना भेटून आमची मागणी त्यांना सांगणार आहोत. म्हणजे मुले आणि चालक व इतरांना होणारा त्रास कमी होईल.
- अनिल गर्ग, अध्यक्ष, स्कूल बस ओनर असोसिएशन