शिक्षणाच्या विकासासाठी मतदार नोंदणी करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षणाच्या विकासासाठी मतदार नोंदणी करा
शिक्षणाच्या विकासासाठी मतदार नोंदणी करा

शिक्षणाच्या विकासासाठी मतदार नोंदणी करा

sakal_logo
By

कल्याण, ता. १२ (बातमीदार) : राज्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी विधान परिषदेमध्ये कोकण विभागातून शिक्षण क्षेत्राची जाण असलेला प्रतिनिधी निवडण्यासाठी सुजाण शिक्षकांची मतदार नोंदणी होणे आवश्यक आहे. शिक्षणाच्या व देशाच्या विकासासाठी शिक्षकांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केले आहे.

कोकण विभागातील मतदार नोंदणीसाठी अनिल बोरनारे विविध शाळा व महाविद्यालयांना भेटी देत असून शिक्षकांशी संवाद करताना त्यांनी शिक्षकांना आवाहन केले. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणीचा पहिला टप्पा ७ नोव्हेंबर रोजी संपला असून कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील तसेच ज्यांचे निवासक्षेत्र कोकणात आहे असे मुंबईतील शाळांमधील शिक्षक यांची मिळून ३१ हजार ५३६ नोंदणी झाली असल्याचे बोरनारे यांनी सांगितले.