दुबईत भारतीय संस्कृतीचा जागर; | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुबईत भारतीय संस्कृतीचा जागर;
दुबईत भारतीय संस्कृतीचा जागर;

दुबईत भारतीय संस्कृतीचा जागर;

sakal_logo
By

बदलापूर, ता. १२ (बातमीदार) : बदलापुरातून नोकरी, उद्योग, व्यवसायानिमित्त दुबईत स्थित झालेल्या तसेच महाराष्ट्राच्या इतर कानाकोपऱ्यातून दुबईत स्थायिक झालेल्या मराठी बांधवांनी मिळून दुबईत भारतीय संस्कृतीचा जागर केला. तेथे त्रिपुरारी पौर्णिमा तसेच तुळसी विवाह परंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. महाराष्ट्राच्या विविध प्रांतांतून दुबईत स्थायिक असलेल्या नागरिकांनी संस्कृती मराठी मंडळाची दुबईत स्थापना केली आहे. या मंडळाच्या वतीने वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. गणेशोत्सव, दिवाळी, गुढी पाडवा, दसरा हे सगळे सण दुबईत आनंद व उत्साहाने साजरे केले जातात. परदेशात राहूनदेखील भारतीय परंपरा अबाधित राहिली पाहिजे, तसेच पुढच्या पिढीला परदेशात राहूनदेखील भारतीय व महाराष्ट्राच्या परंपरेचा इतिहास माहीत असावा. या परंपरेची गोडी असावी यासाठी हे सण उत्सव, इतर सामाजिक उपक्रम आम्ही दुबईमध्ये आयोजित करत असतो. या वर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला झबिल पार्क येथे दिव्यांची आरास करून तुळशी विवाह वैदिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन मंदार कुलकर्णी यांनी केले होते. तसेच या मंडळाचे सदस्य अर्चना, रूपाली, माधुरी, दत्ता, क्रिश यांनीदेखील यात सहभाग घेतला.