बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यकारणी जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यकारणी जाहीर
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यकारणी जाहीर

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यकारणी जाहीर

sakal_logo
By

कल्याण, ता. १२ (बातमीदार) ः बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी विविध पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कल्याण पूर्वमध्ये उपजिल्हा प्रमुख मल्लेश शेट्टी, कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख नीलेश शिंदे, कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड, कल्याण पूर्व विधानसभा समनव्यक (शासकीय योजना) प्रशांत काळे, कल्याण पूर्व उपशहर प्रमुख विशाल पावशे आणि नवीन गवळी यांची नेमणूक करण्यात आली आहे. कल्याण पश्चिमेला शहर प्रमुख रवींद्र पाटील, महिला जिल्हा संघटक छाया वाघमारे, महिला संघटक कल्याण पश्चिम नेत्रा उगले यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. यापूर्वी हे पदाधिकारी संघटनावाढीसाठी काम करत होते; तर यापुढेही जोशात हे पदाधिकारी काम करतील, अशी माहिती या वेळी गोपाळ लांडगे यांनी दिली.