कल्‍याणमध्ये उद्यापासून व्याख्यानमालेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्‍याणमध्ये उद्यापासून व्याख्यानमालेचे आयोजन
कल्‍याणमध्ये उद्यापासून व्याख्यानमालेचे आयोजन

कल्‍याणमध्ये उद्यापासून व्याख्यानमालेचे आयोजन

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १२ (बातमीदार) : कल्याण शहरांमध्ये स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या सुश्राव्य व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण पश्चिम येथील कर्णिक रोड परिसरातील नूतन महाविद्यालयामध्ये १४ नोव्हेंबरपासून ते २० नोव्हेंबरपर्यंत दररोज सायंकाळी ६ ते ८ दरम्यान ही व्याख्यानमाला होणार आहे. यामध्ये महामृत्युंजय मंत्र व मानवी जीवन असा व्याख्यानमालेचा विषय आहे.