विद्यार्थ्यांचा नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड रॉबर्ट यांच्याशी संवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांचा नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड रॉबर्ट यांच्याशी संवाद
विद्यार्थ्यांचा नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड रॉबर्ट यांच्याशी संवाद

विद्यार्थ्यांचा नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड रॉबर्ट यांच्याशी संवाद

sakal_logo
By

पालघर, ता. १२ (बातमीदार) : सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध संशोधक नोबेल पारितोषिक विजेते सर रिचर्ड रॉबर्ट यांच्याशी संवाद साधला. इंटरनॅशनल बोर्ड फॉर एज्युकेशन, रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट या शिक्षण व संशोधन क्षेत्रास योगदान करणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून मुंबई येथे सर रिचर्ड रॉबर्ट यांच्याशी संवाद स्वरूप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
‘माझा नोबेल प्रवास’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सर रिचर्ड रॉबर्ट यांनी लहानपणापासून ते नोबेल पारितोषिकापर्यंतचा आपला प्रवास श्रोत्यांसमोर मांडला. जनुकीय सुधारित वाणांच्या माध्यमातून शेती प्रगतीच्या संदर्भातही त्यांनी आपले विचार मांडत त्यासंदर्भातील विद्यार्थ्यांच्या मनातील असलेले अनेक गैरसमज दूर केले. या शिष्टमंडळाचे नेतृत्व महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. महेश देशमुख यांनी केले.
‘भेट नोबेल विजेत्यांशी’ या उपक्रमांतर्गत प्रत्येक शैक्षणिक वर्षात दांडेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा नोबेल पारितोषिक विजेते प्रसिद्ध शास्त्रज्ञांशी संवाद साधण्यात येतो. मागील वर्षी विद्यार्थ्यांचा जीन मारी लेन या १९९७ सालच्या नोबेल पारितोषिकविजेत्या जीवशास्त्रज्ञांशी संवाद घडवून आणण्यात आला होता. अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती वाढीस लागावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा उपक्रम चालू करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी दिली.
या कार्यक्रमास आयबर्ड या संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मीनाक्षी गुरव यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. महेश देशमुख तसेच प्रा. मकसुद मेमन, प्रा. निधी माळी, प्रा. कल्याणी जोशी, प्रा. जॉबीन जॉर्ज, प्रा. प्रतीक्षा बोरसे व विज्ञान शाखेतील विद्यार्थी उपस्थित होते.