धारावीतील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धारावीतील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
धारावीतील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

धारावीतील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

sakal_logo
By

धारावी, ता. १२ (बातमीदार) : धारावीतील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर अनेक राजकीय, सामाजिक व धार्मिक गटांकडून विविध कार्यक्रमांचे तसेच विविध संदेश देणारे बेकायदा होर्डिंग लावण्यात आले होते. यामुळे रस्त्यांचे विद्रूपीकरण झाले होते. यामुळे धारावीत संताप व्यक्त होत होता. याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये ‘धारावीत अनधिकृत होर्डिंग’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झाली होती. त्याची दखल घेत पालिकेने हे अनधिकृत होर्डिंग हटवले आहेत. यामुळे धारावीतील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.
धारावी मुख्य रस्ता, संत कक्कया मार्ग, संत रोहिदास मार्ग, ९० फुटी कृष्णन मेनन मार्ग, ६० फुटी संत कबीर मार्ग या मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर अनेक दिवसांपासून अनधिकृत होर्डिंग लावण्याची चढाओढ लागली होती. हे होर्डिंग महिनोंमहिने लटकत असतात. यामुळे अनेकदा किरकोळ अपघात होत आहेत. यावर आळा घातला गेला पाहिजे, अशी मागणी होत होती. ‘सकाळ’मधील बातमीने हे अनधिकृत होर्डिंग हटवल्यामुळे स्थानिक रहिवासी समाधान व्यक्त करत आहेत.