उल्हासनगरात महावितरण कार्यालयावर शिवसेनेची धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगरात महावितरण कार्यालयावर शिवसेनेची धडक
उल्हासनगरात महावितरण कार्यालयावर शिवसेनेची धडक

उल्हासनगरात महावितरण कार्यालयावर शिवसेनेची धडक

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. १२ (वार्ताहर) : कॅम्प नंबर पाचच्या परिसरात महावितरणचा मनमानी कारभार सुरू आहे. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक देत आंदोलनाचा इशारा आहे. दिवसातून चार-पाच तास लाईट बंद राहणे, अमाप बिल पाठवणे, बिल भरण्यास उशीर झाला तर मीटर काढून नेणे, नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य न देणे आदी तक्रारींचा पाढा नागरिकांनी शिवसेनेकडे वाचला होता.
त्याचा जाब विचारण्यासाठी आणि मनमानी थांबवण्याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपशहरप्रमुख कैलाश तेजी, शेखर यादव, विभागप्रमुख अनिल लाल्या कुंचे, राजू माने, उपविभागप्रमुख ज्ञानेश्वर करवंदे, राजू चिकने, भगवान भांडे‌, राजू घडियाली, शाखाप्रमुख गणेश चौघुले यांनी कार्यालयावर धडक देऊन निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा अधिकाऱ्यांना दिला.