घोलवडमधील कोलपाडा लोकवस्तीमध्ये पथदिवे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घोलवडमधील कोलपाडा लोकवस्तीमध्ये पथदिवे
घोलवडमधील कोलपाडा लोकवस्तीमध्ये पथदिवे

घोलवडमधील कोलपाडा लोकवस्तीमध्ये पथदिवे

sakal_logo
By

बोर्डी, ता. १२ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील घोलवड ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कोलपाडा लोक वस्तीमध्ये एका देणगीदाराच्या मदतीने पथदिवे लावून आदिवासी वस्तीतील रस्ते उजळण्याचे काम ग्रामपंचायतीचे सरपंच रवींद्र बुजड व उपसरपंच कुणाल शहा यांनी केले. गावात वीज वितरण व्यवस्था सुरू झाली असली, तरी गावातील मुख्य रस्ते वगळता पाड्यावर पथदिव्यांची व्यवस्था नव्हती. याबाबत स्थानिक आदिवासी ग्रामस्थांनी केलेल्या पाठपुराची दखल घेऊन २०० घरे व बाराशे आदिवासी वस्तीमध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आली. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत कमिटीने तातडीने निर्णय घेऊन दीड किलोमीटर मार्गावर साठ पथदिवे लावून आदिवासी लोकवस्तीला प्रकाशात आणल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.