मुंबई विद्यापीठ आंतर विभागीय कुस्ती स्पर्धा उत्‍साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई विद्यापीठ आंतर विभागीय कुस्ती स्पर्धा उत्‍साहात
मुंबई विद्यापीठ आंतर विभागीय कुस्ती स्पर्धा उत्‍साहात

मुंबई विद्यापीठ आंतर विभागीय कुस्ती स्पर्धा उत्‍साहात

sakal_logo
By

शहापूर, ता. १२ (बातमीदार) : शहापुरातील सोनूभाऊ बसवंत महाविद्यालय व मुंबई विद्यापीठ क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोनुभाऊ बसवंत महाविद्यालयात पुरुष गटाची आंतरविभागीय कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे उद्‌घाटन कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग बरोरा यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शहापूर आमदार दौलत दरोडा हे उपस्थित होते. या प्रसंगी शहापूर नगरपंचायत नगराध्यक्षा गायत्री भांगरे, मुंबई विद्यापीठ मुंबई क्रीडा आणि शारीरिक शिक्षण संचालक डॉ. मोहनजी आमृले, मुंबई विद्यापीठ मुंबई ठाणे विभागीय आंतरमहाविद्यालयीन क्रीडा समिती सचिव डॉ. चंद्रकांत म्हात्रे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, खजिनदार व ठाणे जिल्हा तालीम संघ अध्यक्ष सुरेश पाटील, सचिव प्रकाश गोंधळी, ज्ञानवर्धिनी संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष किशोर कुडव, उपाध्यक्ष देवेंद्र पोपटलाल शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
या कुस्ती स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाच्या ठाणे, कोकण, मुंबई व रायगड या चार विभागांमधील एकूण ५३ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाने नियोजनबद्ध पद्धतीने केले होते. या स्पर्धेच्या परीक्षकांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.