केवळ ३३ पोलिस पाटलांवर ६० गावांचा कारभार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केवळ ३३ पोलिस पाटलांवर ६० गावांचा कारभार
केवळ ३३ पोलिस पाटलांवर ६० गावांचा कारभार

केवळ ३३ पोलिस पाटलांवर ६० गावांचा कारभार

sakal_logo
By

विक्रमगड, ता. १२ (बातमीदार) : शासनाने प्रत्येक गावात महसूल गावानुसार पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावासाठी स्वतंत्र पोलिस पाटलांचे पद नियुक्त केले आहे; मात्र विक्रमगड तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून केवळ ३३ पोलिस पाटील ६० गावांचा संपूर्ण भार सांभाळत आहे. त्यामुळे एका पोलिस पाटलाला दोन गावांची जबाबदारी येऊन ठेपल्याने तारेवरची करसत करावी लागत आहे.
सध्या पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी प्रत्येक पोलिस पाटलास विशिष्ट गणवेश दिला आहे. त्याच गणवेशामध्ये त्यांनी काम करावे, असे सांगण्यात आले आहे. तालुक्यात २७ पोलिस पाटलांची पदे रिक्त असल्याने प्रत्येकाला दोन गावांची जबाबदारी स्वीकारावी लागत आहे. त्यामुळे अतिरिक्त कामाचा ताण वाढत आहे. गाव खेड्यामध्ये होत असलेले वाद, भांडणे, अडचणी सोडवण्यासाठी, गावामध्ये सलोखा राखणे, पोलिसांना गावाची माहिती पुरविणे, विविध दाखले देणे, सरकारी कामे करून घेणे, त्याबाब आलेल्या अधिका-यांना माहिती देणे. या कामाकरिता दररोज पोलिस पाटलांना तत्पर राहावे लागते. त्यातच शासनाने दिलेले मानधन खूप कमी असल्याने त्यामध्ये वाढ करावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.
शासनाचे पोलिस पाटलांकडे दुर्लक्ष असून त्यांना गेल्या १२ वर्षांपासून प्रवास भत्ता मिळलेला नाही. त्यांच्या मानधनात वाढ झालेली नाही व रिक्त पदे भरण्यात आलेली नाही. याबाबत संघटनेने शासनाकडे पत्रव्यवहार केलेला असूनदेखील त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे समोर आले आहे. शासनाने पोलिस पाटलांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन पाठपुरावा करावा, अशी मागणी पोलिस पाटील संघटनेने केली आहे.

................
गेल्या १२ वर्षांपासून पोलिस पाटलांना प्रवास भत्ता मिळालेला नाही. तसेच विक्रमगड तालुक्यात २७ पोलिस पाटलांची पदे रिक्त असल्याने एकेकाला दोन दोन महसुली गांवाची अतिरिक्त जबाबदारी स्वीकारावी लागत आहे. शिवाय मानधनातदेखील वाढ झालेली नाही, याकडे शासनाने लक्ष द्यावे.
- राजेंद्र पाटील, कार्यध्यक्ष, पोलिस पाटील संघटना, पालघर