बोईसर रेल्वे स्थानकात दिव्यांग-वृद्धांसाठीच्या लिफ्टचा तरुण प्रवाशांकडून वापर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोईसर रेल्वे स्थानकात दिव्यांग-वृद्धांसाठीच्या लिफ्टचा तरुण प्रवाशांकडून वापर
बोईसर रेल्वे स्थानकात दिव्यांग-वृद्धांसाठीच्या लिफ्टचा तरुण प्रवाशांकडून वापर

बोईसर रेल्वे स्थानकात दिव्यांग-वृद्धांसाठीच्या लिफ्टचा तरुण प्रवाशांकडून वापर

sakal_logo
By

मनोर, ता. १२ (बातमीदार) : पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्थानकात मोठ्या संख्येने प्रवाशांची वर्दळ असते. बोईसर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर दिव्यांग आणि वृद्धांच्या वापरासाठी लिफ्टची सोय करण्यात आली आहे; पण या लिफ्टचा वापर तरुण प्रवाशांकडून केला जात असल्याने दिव्यांग आणि वृद्ध प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे या प्रवेशद्वारावर ही लिफ्ट दिव्यांग व वृद्धांच्या वापरासाठी असल्याचा फलक लावण्यात आला आहे; तरीही तरुणांकडून या लिफ्टचा वापर केला जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तरुण प्रवासी लिफ्टचा वापर करीत असल्याने दिव्यांग व वृद्ध प्रवाशांना रांगेत उभे राहावे लागत आहे. यामुळे दिव्यांग आणि वृद्ध प्रवाशांच्या नियोजित गाड्या चुकत आहेत. लिफ्टचा वापर करण्यासाठी दिव्यांग व वृद्ध प्रवाशांना प्राधान्य देण्याची मागणी दिव्यांग संस्थेच्या वतीने केली जात आहे.
....
मनोर : लिफ्टच्या प्रवेशद्वारावर ठळकपणे सूचना असूनही तरुणांकडून लिफ्टचा वापर केला जात आहे.