जिल्हा परिषदेवर अध्यक्ष, उपाध्यक्ष महाविकास आघाडीचाच : सुनील शिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा परिषदेवर अध्यक्ष, उपाध्यक्ष महाविकास आघाडीचाच : सुनील शिंदे
जिल्हा परिषदेवर अध्यक्ष, उपाध्यक्ष महाविकास आघाडीचाच : सुनील शिंदे

जिल्हा परिषदेवर अध्यक्ष, उपाध्यक्ष महाविकास आघाडीचाच : सुनील शिंदे

sakal_logo
By

पालघर, ता. १२ (बातमीदार) : सत्तेचा कसा दुरुपयोग केला जातो हे प्रसारमाध्यमांद्वारे दिसून येत आहे. यात शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य आणि त्यांच्या कुटुंबीयांवर पोलिसांमार्फत दबाव तंत्राचा वापर करून त्यांना जबरदस्ती करून आपल्या गटात कसे सामील करता येईल, यासाठी प्रयत्न केले आहेत; पण पालघर जिल्हा परिषद सदस्य निष्ठावान आहेत ते संघटनेच्या आदेशाचे उल्लंघन करणार नाहीत, त्यांच्यावर किती दबाव आणला, तरी ते खंबीर आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडून येईल, असे उद्धव ठाकरे गटाचे आमदार व पालघर जिल्हा संपर्कप्रमुख सुनील शिंदे यांनी सांगितले.
पालघर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीसाठी आमदार सुनील शिंदे पालघरमध्ये आले होते. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. महाविकास आघाडीचा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष त्या ठिकाणी बसला पाहिजे, त्या दृष्टीने आमची आखणी झालेली आहे; पण सध्या सत्ताधाऱ्यांकडून कुटील नितीचा वापर सुरू आहे, त्याचा मी निषेध करतो.
पालघर जिल्हा परिषदेमध्ये १६ नोव्हेंबर रोजी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे; मात्र सत्तास्थापनेसाठी जिल्हा परिषद सदस्य पळवापळवीचे प्रकार सुरू आहेत. राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी हा प्रकार सुरू आहे, तशा तक्रारी ही पोलिस ठाण्यात केल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.