नवीन शैक्षणिक धोरणासाठी स्वागतशील व्हा - विठ्ठलराव कांबळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवीन शैक्षणिक धोरणासाठी स्वागतशील व्हा - विठ्ठलराव कांबळे
नवीन शैक्षणिक धोरणासाठी स्वागतशील व्हा - विठ्ठलराव कांबळे

नवीन शैक्षणिक धोरणासाठी स्वागतशील व्हा - विठ्ठलराव कांबळे

sakal_logo
By

जोगेश्वरी, ता. १२ (बातमीदार) ः ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ यशस्वी व्हायचे असेल, तर शिक्षण संस्था चालविणारे संचालक, शिक्षक, पालक यांनी पुढाकार घेऊन त्यांना स्वागतशील व्हावे लागेल, भविष्यवेधी दृष्टी ठेवावी लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण विभाग प्रांत कार्यवाह विठ्ठलराव कांबळे यांनी केले.
जोगेश्वरीच्या अस्मिता-सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थेने आयोजित केलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सेवाव्रती कर्मचाऱ्यांशी ‘परिसंवाद’ कार्यक्रमात बोलत होते. गेल्या ४६ वर्षांपासून अस्मिता संस्था सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे. संस्थेने बोरिवली येथे ‘मनोहर हरिराम चोगले-अस्थिव्यंग चिकित्सा व पुनर्वसन केंद्र’ सुरू केले आहे. आज पर्यंत शेकडो दिव्यांग मुलांना सामान्य मुलांप्रमाणे कौशल्यावर आधारित शिक्षण देऊन पालकांचेही समुपदेशन केले आहे. तसेच रोजगारनिर्मिती करून स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखविला.
विठ्ठलराव कांबळे यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करताना समाजात अशी सेवाकार्य उभी करणाऱ्या, प्रेरित करणाऱ्या अस्मितासारख्या असंख्य संस्था उभ्या राहिल्या पाहिजेत. अशा संस्थांच्या सेवाकार्याच्या कहाण्या समाजातील अनेक कार्यरत संस्था, कार्यकर्ते, तरुणापर्यंत प्रेरणा स्वरूपाने पोहोचल्या पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर पारखी, शिक्षण प्रकल्पप्रमुख श्रीकांत खंडकर, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष फडतरे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रचना पवार, पूर्व प्राथमिक विभागाच्या क्षमा मोंडकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.