बिबट्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिबट्या
बिबट्या

बिबट्या

sakal_logo
By

सफर प्राण्यांची
--

बिबट्याची जोडी

स्थळ : वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय
नावे : ड्रॅगन (नर ः ६ वर्षे) आणि पिंटू (मादी ः १० वर्षे)
कुठून आले : पिलिकुला बायोलॉजिकल पार्क प्राणिसंग्रहालय (कर्नाटक)
कसे आले : एप्रिल २०१९ मध्ये प्राणी विनिमय कार्यक्रमाअंतर्गत आगमन
स्वभाव : ड्रॅगन आक्रमक आणि खोडकर आहे. पिंटू काहीशी हुशार अन् शांत आहे
कुळ ः मार्जार
शास्त्रीय नावे : पँथरा पार्डस फसका
वजन :  ड्रॅगन ६० किलो. पिंटू : ३२ किलो
सरासरी आयुष्य : १५ ते १८ वर्षे
खाद्य : मुख्य खाद्य म्हणजे खूर असलेले प्राणी. बिबटे माकडे वा उंदरांसारखे कृंतक प्राणी, सरीसृप (सरपटणारे प्राणी), उभयचर, पक्षी व किडेही खातात. कधी कधी ते कोल्ह्यासारखे इतर लहान शिकारी प्राणीही खातात
नावाचा इतिहास : महाराष्ट्रात बिब्बा नावाचे झाड आढळते. त्या झाडाच्या बियांमुळे माणसाच्या त्वचेवर पुरळ उठून ठिपके तयार होतात. त्यावरून मराठीत बिबट्या असे नाव पडले
चपळ प्राणी : बिबटे चपळ शिकारी आहेत. जातकुळीतील इतर मार्जारांपेक्षा ते आकारमानाने लहान असले, तरी त्यांच्या मोठ्या कवटीमुळे त्यांना मोठ्या भक्ष्यांची शिकार करता येते.
विशेष : बिबटे मनुष्यवस्तीजवळ राहणे जास्त पसंत करतात. तेथील कुत्री आणि पाळीव जनावरे त्यांचे आवडते भक्ष्य आहे. त्यामुळेच दरवर्षी बिबट्या मनुष्यवस्तीत घुसण्याच्या शेकडो घटना घडतात.