लायन्स क्लबतर्फे उद्या मधुमेह तपासणी शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लायन्स क्लबतर्फे उद्या मधुमेह तपासणी शिबिर
लायन्स क्लबतर्फे उद्या मधुमेह तपासणी शिबिर

लायन्स क्लबतर्फे उद्या मधुमेह तपासणी शिबिर

sakal_logo
By

ठाणे, ता. १२ (बातमीदार) : लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्स महाराष्ट्र यांच्या विद्यमाने ठाण्यात मधुमेह तपासणी शिबिर आयोजित करण्यात आली आहे. हे शिबिर सोमवारी (ता. १३) ठाण्यासह संपूर्ण मुंबईत आयोजित करण्यात आले आहे; तरी जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाण्यातील लायन्स क्लबप्रमुख अनघा गांधी यांनी केले आहे. कळवा रेल्वे स्टेशन, ठाणे रेल्वे स्टेशन, मुलुंड रेल्वे स्टेशन, भांडुप रेल्वे स्टेशन, घाटकोपर रेल्वे स्टेशन, गुरुद्वारा तीन हात नाका, न्यू महालक्ष्मी नगर मंदिर, अशोक नगर ठाणे, जीवन विहार सीएचएस रोड, कोपरकर रोड- नाहूर पूर्व, कांजूर रेल्वे स्टेशन, विक्रोळी रेल्वे स्टेशन व चेंबूर रेल्वे स्टेशन येथे ही शिबिरे होणार आहेत.