डोंबिवलीत वीजचोरीप्रकरणी २० जणांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोंबिवलीत वीजचोरीप्रकरणी २० जणांवर कारवाई
डोंबिवलीत वीजचोरीप्रकरणी २० जणांवर कारवाई

डोंबिवलीत वीजचोरीप्रकरणी २० जणांवर कारवाई

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १३ : डोंबिवली शहरात वीजचोरीची घटना उघडकीस आल्या असून महावितरणकडून २० जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सहा लाख चार हजार रुपयांची वीजचोरी झाल्याचे समोर आले आहे. तसेच दोन ठिकाणी अनधिकृतरीत्या वीजवापर केला जात असल्याचेदेखील उघडकीस आले आहे. महावितरणच्या डोंबिवली विभागात वीजचोरी शोधमोहीम राबवण्यात आली. ११ पथकांच्या माध्यमातून नवापाडा, गावदेवी परिसर, ठाकूरवाडी, रेतीबंदर परिसरात १९३ वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली. यात २० ठिकाणी सहा लाख चार हजार रुपयांची वीजचोरी आढळून आली. बहुतांश ठिकाणी मीटरकडे येणाऱ्या केबलला सहज लक्षात येणार नाही, अशा पद्धतीने दुसरी केबल जोडून वीजचोरी होत असल्याचे आढळून आले. कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, कल्याण मंडल एकचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड व त्यांच्या टिमने ही कारवाई केली.