चिमुरड्या विद्यार्थ्यांना गाडीत कोंबून वाहतूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिमुरड्या विद्यार्थ्यांना गाडीत कोंबून वाहतूक
चिमुरड्या विद्यार्थ्यांना गाडीत कोंबून वाहतूक

चिमुरड्या विद्यार्थ्यांना गाडीत कोंबून वाहतूक

sakal_logo
By

मुरबाड, ता. १३ (बातमीदार) : मुरबाड शहरात इंग्रजी माध्यमातील शाळेत शिकणाऱ्या लहान मुलांना वाहनांमध्ये कोंबून नेले जाते. शाळाचालकांनी विद्यार्थ्यांना घरी जाण्या-येण्याकरिता बस चालू केल्या असून त्या बसचा खर्चसुद्धा पालक भरत आहेत. या गाड्यांमध्ये मर्यादेच्या बाहेर विद्यार्थी भरून नेले जातात. शाळा व्यवस्थापक यांच्यामुळे लहान मुलांच्या जीवाला धोका होऊ शकतो. शिक्षणाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनर्माण विद्यार्थी सेनेचे मुरबाड शहर अध्यक्ष देवेंद्र जाधव यांनी केली आहे. निवेदनाची प्रत मुरबाड पोलिस ठाण्यातही देण्यात आली आहे.