रेल्वेच्या चुकीच्या निर्णयाचा फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वेच्या चुकीच्या निर्णयाचा फटका
रेल्वेच्या चुकीच्या निर्णयाचा फटका

रेल्वेच्या चुकीच्या निर्णयाचा फटका

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मध्य रेल्वे प्रशासनाच्या एका चुकीच्या निर्णयामुळे तब्बल ३२ लाखांचा चुराडा झाला आहे. मध्य रेल्वेचा विद्याविहार येथील पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला एक्सलेटर नवीन रेल्वे ओव्हरबिजमुळे तोडण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करत दोषी अधिकाऱ्यांच्या वेतनातून झालेला ३२ लाखांचा खर्च वसूल करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे.
रेल्वेरूळ ओलांडण्याच्या घटनांचे प्रमाण रोखण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वेच्या मुंबई विभागातील सरकते जिने आणि लिफ्ट बसविण्यात येत आहे. तसेच मध्य रेल्वेच्या विद्याविहार स्थानकाचा पश्चिम येथील एक्सलेटर ३१ डिसेंबर २०१६ रोजी बांधण्यात आला होता. याकरिता मध्य रेल्वेने ३० लाख रुपये खर्च केले होते; मात्र आता नव्या रेल्वे ओव्हरबिजमुळे एक्सलेटर तोडण्यात येणार आहे. सदर एक्सलेटर तोडण्यासाठी रेल्वेकडून दोन लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.

काय आहे समस्‍या
अधिकांश वेळी बंद असलेल्या एक्सलेटरबाबत मध्य रेल्वेचे म्हणणे आहे की, मशीनच्या खालच्या भागात पाणी घुसल्याने एक्सलेटरचा काही भाग क्षतिग्रस्त झाला आहे. यामुळे एक्सलेटर काम करत नव्हता. पूर्व भागात दोन नवीन एक्सलेटर बसविले जाणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली आहे.

कारवाईची मागणी
अनिल गलगली यांनी सांगितले की, विद्याविहार स्थानकाचा पश्चिम येथील एक्सलेटरची सुरुवातीला गुणवत्ता राखली गेली नाही आणि प्रस्तावित फूटओव्हर ब्रिजचा विचार केला नाही. रेल्वे ओव्हरबिजच्या बांधकामात अडथळा येत असल्याने एक्सलेटर तोडला जाणार आहे. यामुळे ३२ लाखांचा चुराडा झाला आहे. याबाबत चौकशी करून दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करत त्यांच्या वेतनातून ३२ लाखांचा खर्च वसूल करण्याची मागणी गलगली यांनी केली आहे.