चोरीतील तिन्ही आरोपी गजाआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चोरीतील तिन्ही आरोपी गजाआड
चोरीतील तिन्ही आरोपी गजाआड

चोरीतील तिन्ही आरोपी गजाआड

sakal_logo
By

ठाणे (वार्ताहर) : स्विगी डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगत घरात प्रवेश करत चाकूच्या धाकावर जबरी चोरी करून पोबारा केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून तिघे जण फरारी झाले होते. त्या तिन्ही आरोपींना एक लाख रुपयांच्या दोन दुचाकींसह अटक करण्यात नौपाडा पोलिसांना यश आले आहे. घरातील केअर टेकरचे हातपाय बांधून लॉकर्सच्या चाव्या घेऊन शोधाशोध केली. अखेर त्यांच्या खिशातील रक्कम आरोपी घेऊन पाईपवरून पळून गेले. या फरारी आरोपींचा शोध नौपाडा पोलिस घेत होते; पण आरोपींचा ठावठिकाणा सापडत नसल्याने गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाकडे सोपविण्यात आला. अटक आरोपी शशिकांत अशोक राय याच्याकडील माहितीच्या आधारे तांत्रिक तपास करून आरोपी ऋतिक नेगी (वय २०), शुभम फाफाळे (२२), मयूर महाले (२२) यांना ताब्यात घेतले.