पालघर जिल्ह्यातील दडपशाहीविरोधात रस्त्यावर उतरणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघर जिल्ह्यातील दडपशाहीविरोधात रस्त्यावर उतरणार
पालघर जिल्ह्यातील दडपशाहीविरोधात रस्त्यावर उतरणार

पालघर जिल्ह्यातील दडपशाहीविरोधात रस्त्यावर उतरणार

sakal_logo
By

विरार, ता. १२ (बातमीदार) : राज्यातील सरकार हे शिवसैनिकांवर पक्षप्रवेशासाठी पालघरमध्ये दडपशाही करत आहे. त्याविरोधात रस्त्यावरची लढाई लढावी लागणार असून त्याचे नेतृत्व करणार असल्याची घोषणा सेनेचे नेते भास्कर जाधव यांनी नालासोपारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत करत शिंदे गटाला आव्हान दिले आहे. जाधव आज नालासोपाऱ्यात शिवसेनेच्या मेळाव्यासाठी आले होते.

जाधव यांनी या वेळी बोलताना भाजप आणि शिंदे गटावर टीका केली. भाजपने षड्‍यंत्र करून शिवसेना फोडल्याचा आरोपही त्यांनी केला. शिंदे गटातील आमदारांच्या नाराजीवर बोलताना त्यांनी सांगितले की, भाजपने शिवसेना फोडण्याचे काम केले असून फुटलेल्या आमदारांबरोबरच भाजपमध्येही नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी पालघर जिल्हा संपर्कप्रमुख सुनील शिंदे, जिल्हाप्रमुख पंकज देशमुख, माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, तालुकाप्रमुख स्वप्नील बांदेकर, जनार्दन पाटील आदी उपस्थित होते.