नवी मुंबईतील चार पोलिस उपायुक्तांना नेमणुका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबईतील चार पोलिस उपायुक्तांना नेमणुका
नवी मुंबईतील चार पोलिस उपायुक्तांना नेमणुका

नवी मुंबईतील चार पोलिस उपायुक्तांना नेमणुका

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १२ (वार्ताहर) : राज्य सरकारने नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात चार पोलिस उपायुक्तांची नेमणूक केली आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात नव्याने दाखल झालेल्या चारही पोलिस उपायुक्तांची नेमणूक शनिवारी पोलिस आयुक्त बिपिनकुमार सिंह यांनी केली.

मिरा-भाईंदर येथून नवी मुंबईत दाखल झालेले अमित काळे यांना गुन्हे शाखेचे उपायुक्तपद बहाल करण्यात आले. नागपूरमधून आलेले पंकज डहाणे यांच्यावर पोलिस आयुक्तांनी परिमंडळ-२ च्या उपायुक्तपदाची जबाबदारी सोपविली. याशिवाय फोर्स-१ मुंबई येथून नवी मुंबईत नियुक्ती झालेल्या तिरुपती काकडे यांच्यावर नवी मुंबईच्या वाहतूक विभागाची; तर मिरा-भाईंदर पोलिस आयुक्तालयातून नवी मुंबईत आलेले संजयकुमार पाटील यांच्यावर विशेष शाखेची जबाबदारी पोलिस आयुक्त बिपिनकुमार सिंह यांनी सोपविली आहे. नवी मुंबईतून बदली झालेले मुख्यालयाचे पोलिस उपायुक्त अभिजित शिवथरे यांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आले नसून नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील आणखी एक पोलिस उपायुक्तपद रिक्त राहिलेले आहे.