दिव्यांग मंत्रालयाचे शहापुरात प्रहार संघटनेकडून स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांग मंत्रालयाचे शहापुरात प्रहार संघटनेकडून स्वागत
दिव्यांग मंत्रालयाचे शहापुरात प्रहार संघटनेकडून स्वागत

दिव्यांग मंत्रालयाचे शहापुरात प्रहार संघटनेकडून स्वागत

sakal_logo
By

खर्डी, ता. १३ (बातमीदार) : प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या प्रयत्नांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात देशातील पहिले दिव्यांग मंत्रालय होणार असल्याचे जाहीर केले. प्रहार संघटनेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख हितेश जाधव, जिल्हा अध्यक्ष अॅड. स्वप्नील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शहापूर येथील शिवतीर्थावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून फटाके फोडून व मिठाई वाटून जल्लोष साजरा केला. दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय होणार असल्याने दिव्यांगांच्या अडचणी तत्काळ सोडवण्यासाठी मदत होणार असल्याने त्‍यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असल्याचे तालुका अध्यक्ष वसंत पानसरे यांनी या वेळी सांगितले.