ऐतिहासिक शस्त्रांच्या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऐतिहासिक शस्त्रांच्या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद
ऐतिहासिक शस्त्रांच्या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

ऐतिहासिक शस्त्रांच्या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

sakal_logo
By

शहापूर, ता. १३ (बातमीदार) : शहापुरात माऊली प्रतिष्ठानच्या वतीने बालदिनाच्या पूर्वसंध्येला ऐतिहासिक शस्त्रांसह, वस्तूंचे ‘शस्त्रगाथा इतिहासाची’ हे भव्य प्रदर्शन शनिवारी दिवसभर विठ्ठलराव खाडे सभागृहात भरवण्यात आले होते. त्याला शालेय विद्यार्थ्यांसह राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या ऐतिहासिक शस्त्रांच्या प्रदर्शनात शिवकालीन इतिहासाच्या आठवणींना उजाळा मिळाला. या वेळी शहापुरातील ग. वि. खाडे विद्यालय, पी. एस. देशमुख इंग्रजी माध्यम शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सुमारे सात हजार विद्यार्थ्यांनी आणि जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, पोलिस अधिकारी आदींनी या प्रदर्शनास भेट दिली. त्या वेळी या सर्व विद्यार्थ्यांसह उपस्थित मान्यवरांना इतिहास संशोधक श्रीदत्त राऊत यांनी प्रदर्शनातील ऐतिहासिक शस्त्रांची माहिती दिली. या प्रदर्शनात मिळणाऱ्या मानधनाचा विनियोग राज्यातील गड, किल्‍ल्‍यांचे संवर्धन करण्यासाठी केला जात असल्याचे राऊत यांनी सांगितले.