विद्युत पुरवठा करणाऱ्या केबलला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्युत पुरवठा करणाऱ्या केबलला आग
विद्युत पुरवठा करणाऱ्या केबलला आग

विद्युत पुरवठा करणाऱ्या केबलला आग

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : यशोधननगर येथील ठाणे महापालिका शाळा क्रमांक ४६ च्या मागे महावितरणच्या डीपीतून शाळेला विद्युतपुरवठा करणाऱ्या केबलला व जवळ असलेल्या कचऱ्याला आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी महावितरण विभागाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले असून यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही.