अवकाळी पावसामुळे कांद्याचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवकाळी पावसामुळे कांद्याचे नुकसान
अवकाळी पावसामुळे कांद्याचे नुकसान

अवकाळी पावसामुळे कांद्याचे नुकसान

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १३ (बातमीदार) : अवकाळी पावसाचा फटका कांदा उत्पादनाला बसला आहे. लाल कांद्याचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्याला या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांदा विक्रीसाठी आला असून त्याची स्वस्त दरात विक्री होत आहे; मात्र खरेदी झालेला कांदा हा बहुतांश खराब आहे. हा कांदा लवकर खराब होत सल्याने त्याची साठवणूकही करता येत नाही. होलसेल बाजारात लाल कांदा हा ७ ते २८ रुपये दराने विक्री होत आहे. कांदा लवकर खराब होत असल्याने शेतकऱ्याला स्वतःचे नुकसान करून कमी किमतीत हा कांदा विकावा लागत आहे.