खेड येथे आरोग्य तपासणी शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड येथे आरोग्य तपासणी शिबिर
खेड येथे आरोग्य तपासणी शिबिर

खेड येथे आरोग्य तपासणी शिबिर

sakal_logo
By

मुरबाड, ता. १३ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यातील दुर्गम भागातील खेड येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात रक्तातील साखर, ईसीजी, रक्त तपासणी व इतर आरोग्य चाचण्या मोफत करण्यात आल्या. क्रिस्टल केअर हॉस्पिटल आसनगाव यांच्या सौजन्याने तसेच टोकावडे परिसरातील युवा नेतृत्व महेश भांगे व बुरसुंगे ग्रामपंचायतीचे उपसरपंच दशरथ राऊत यांच्यामार्फत हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. डॉ. प्रवीण पाटील, डॉ. हिमानी भेरे, नामदेव विशे यांच्या टीमने आरोग्य तपासणी केली. शिबिरासाठी शेलवले दादा, बाबुराव भोईर, ऋतिक म्हारसे, सूरज घुडे, दशरथ राऊत व खेड ग्रामस्थांनी मोलाचे योगदान दिले. आयुष्यमान भारत योजनेचे कार्डे या वेळी वाटप करण्यात आली.