विविध मागण्यांसाठी मंत्री कपिल पाटील यांना निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विविध मागण्यांसाठी मंत्री कपिल पाटील यांना निवेदन
विविध मागण्यांसाठी मंत्री कपिल पाटील यांना निवेदन

विविध मागण्यांसाठी मंत्री कपिल पाटील यांना निवेदन

sakal_logo
By

शहापूर, ता. १३ (बातमीदार) : भाजपचे कसारा शहर अध्यक्ष विनायक सावंत आणि लोकप्रतिनिधींनी नुकतीच केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांची भेट घेऊन कसाऱ्यातील स्थानिक समस्या सोडविण्याबाबत साकडे घातले.
कसारा हे मध्य रेल्वेचे उपनगरीय लोकलचे अंतिम रेल्वे स्टेशन आहे. दिवसेंदिवस कसाऱ्याची लोकसंख्या वाढत आहे. कसारा गावासाठी गावठाणला मंजुरी मिळविणे, वाढत्या लोकसंख्येचा विचार करता नागरिकांना अत्यावश्यक पाणीपुरवठयाची सुविधा निर्माण करणे अशा विविध सुविधा उपलब्ध होण्याकरिता केंद्राकडून विशेष निधी प्राप्त व्हावा व इतर मागण्यांचे निवेदन मंत्री कपिल पाटील यांना देण्यात आले.
केंद्रीय मंत्री पाटील यांनीही सकारात्मक चर्चा करून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. या वेळी मोखावणे-कसारा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश वीर, उपसरपंच शरद वेखंडे तसेच ज्येष्ठ समाजसेवक हरिभाऊ वेखंडे, मोखावणे पोलिस पाटील पांडुरंग भोईर व इतर मान्यवर उपस्थित होते.