बालदिनानिमित्ताने फ्लॅश मॉब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालदिनानिमित्ताने फ्लॅश मॉब
बालदिनानिमित्ताने फ्लॅश मॉब

बालदिनानिमित्ताने फ्लॅश मॉब

sakal_logo
By

मालाड, ता. १३ (बातमीदार) ः बालदिनानिमित्त राष्ट्र सेवा दल व सफल विकास वेल्फेअर सोसायटीच्या वतीने मालाड पश्चिमेतील भुजाले तलावालगत फ्लॅश मॉबचे आयोजन केले होते. याप्रसंगी चिमुकल्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या विचारांचा गजर केला. या वेळी तरुण–तरुणींनी रस्त्यावर नृत्य करत सामान्यांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी तरुणांनी हातात पंडित जवाहरलाल नेहरूंचे विचार लिहिलेले फलक आणि बॅनर धरले होते. या वेळी काँग्रेसचे सचिव संतोष चिकणे यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. तसेच राष्ट्र सेवा दल, काचपाडा अध्यक्षा आरोक्या मेरी चेट्टी, नमिता मिश्रा, मनोज परमार, सफल विकास वेल्फेअरच्या सचिव वैशाली महाडिक, कृष्णा वाघमारे, फिरोझ अन्सारी यांचे महत्त्‍वाचे योगदान होते. येणाऱ्या काळात मालवणी, काचपाडा, ओर्लेम परिसरात फ्लॅश मॉब करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.