टेम्पोच्‍या धडकेने चिमुकलीचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टेम्पोच्‍या धडकेने चिमुकलीचा मृत्यू
टेम्पोच्‍या धडकेने चिमुकलीचा मृत्यू

टेम्पोच्‍या धडकेने चिमुकलीचा मृत्यू

sakal_logo
By

मानखुर्द, ता. १३ (बातमीदार) ः ट्रॉम्बेच्या चिता कॅम्प परिसरात शनिवारी (ता. १२) दुपारी टेम्पोची धडक लागून झोया शेख (वय २ वर्षे) या चिमुकलीचा मृत्यू झाला. ती तिच्या भावंडांसह खेळत असताना टेम्पोने तिला धडक दिली व ती पडल्यावर तिच्या अंगावरून टेम्पो गेला. तिचा मृतदेह घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात पोलिसांनी पाठवला आहे. झोयाचे वडील जाफर शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवून आलम कुरेशी या टेम्पोचालकाला ट्रॉम्बे पोलिसांनी अटक केली आहे. चिता कॅम्पमधील मुस्लिम कब्रस्तानाजवळ शनिवारी दुपारी दोन वाजता झोया तिच्या भावंडांसह खेळत होती. त्या वेळी बांधकाम साहित्य घेऊन जाणाऱ्या तीनचाकी टेम्पोने तिला धडक दिली. त्या धडकेमुळे ती खाली पडली व तिच्या अंगावरून तो टेम्पो गेला. या अपघातात गंभीर इजा झाल्यामुळे झोयाचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सहायक निरीक्षक आशा कदम या घटनेचा तपास करत आहेत.