विद्यापीठाच्या स्पर्धेत श्री गणेश आखाड्याचे मल्ल चमकले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठाच्या स्पर्धेत श्री गणेश आखाड्याचे मल्ल चमकले
विद्यापीठाच्या स्पर्धेत श्री गणेश आखाड्याचे मल्ल चमकले

विद्यापीठाच्या स्पर्धेत श्री गणेश आखाड्याचे मल्ल चमकले

sakal_logo
By

भाईंदर, ता. १३ (बातमीदार) : शहापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या मुंबई विद्यापीठ आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत भाईंदर येथील श्री गणेश आखाड्यातील पैलवानांनी चमकदार कामगिरी केली. आखाड्यातील पैलवानांनी दोन सुवर्णपदके, एक रौप्य व एक कास्यपदक पटकावले आहे.
मुंबई विद्यापीठ व शहापूर येथील सोनुभाऊ बसवंत कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यात श्री गणेश आखाड्याचे प्रिन्स यादव याने ६१ किलो वजनी गटात व कोमल देसाई हिने ५३ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे. याशिवाय ९२ किलो वजनी गटात सूर्यकांत देसाई याने रौप्यपदक व ६५ किलो वजनी गटात सुयश झांबरे याने कास्यपदक पटकावले आहे. सुवर्णपदकविजेते प्रिन्स यादव व कोमल देसाई आता अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेत मुंबई विद्यापीठाचे नेतृत्व करणार आहेत.