बविआचे सदस्य नोंदणी अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बविआचे सदस्य नोंदणी अभियान
बविआचे सदस्य नोंदणी अभियान

बविआचे सदस्य नोंदणी अभियान

sakal_logo
By

विरार, ता. १३ (बातमीदार) : ग्रामपंचायत निवडणुका, तसेच आगामी जिल्हा परिषद अध्यक्ष, वसई विरार महापालिकेची निवडणूक लक्षात घेऊन बहुजन विकास आघाडीतर्फे विरार येथील विवा महाविद्यालयात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला आमदार हितेंद्र ठाकूर, माजी महापौर राजीव पाटील, आमदार क्षितिज ठाकूर, राजेश पाटील, प्रवीण शेट्टी, माजी खासदार बळीराम जाधव, नारायण मानकर, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, पंकज ठाकूर आदी उपस्थितीत होते. या वेळी बहुजन विकास आघाडीच्या सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली, तसेच नवनिर्वाचित पंचायत समिती सभापती, उपसभापती आणि नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी कार्यकर्त्यांशी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी पालघर जिल्ह्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात ही चर्चा करण्यात आली.