प्रीमियर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रीमियर
प्रीमियर

प्रीमियर

sakal_logo
By

‘स्प्लिट्सविला १४’चा दोन बेटांवर मुक्काम
एमटीवीचा बहुचर्चित शो ‘स्प्लिट्सविला १४’ पुन्हा एकदा परत आला आहे. या शोची चर्चा खूप दिवसांपासून सुरू होती. नुकतेच या शोचा प्रोमोदेखील प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमध्ये मुले आणि मुली आपला जीवनसाथी शोधण्यासाठी तयार आहेत. मात्र, प्रोमोमध्ये काहींचे खटकेही उडताना दिसत आहेत. या वेळेस सनी लिओन आणि अर्जुन ब्रिजलानी शोचे सूत्रसंचालन करणार असून ते मार्गदर्शक म्हणूनही काम पाहणार आहेत. यंदा स्पर्धकांमध्ये छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सेलिब्रिटींचा समावेश आहे. स्प्लिट्सविला १४ची यंदा ‘इस बार प्यार है समुद्र पर’ अशी थीम ठेवण्यात आली आहे. आयल ऑफ व्हीनस आणि आयल ऑफ मार्स या दोन बेटांवर हा शो चालणार आहे. हे सर्व स्पर्धक तिथेच राहणार असून तेथेच प्रत्येकाला टास्क दिले जाणार आहे. हा शो सुरू होण्याची सगळेच आतुरतेने वाट पाहत असून लवकरच एम टीव्हीवर तो आपल्याला पाहायला मिळणार आहे.