प्रीमियर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रीमियर
प्रीमियर

प्रीमियर

sakal_logo
By

बॅण्ड बाजासोबत ‘वऱ्हाडी वाजंत्री’चे स्वागत
अभिनेता व दिग्दर्शक विजय पाटकरच्या ‘वऱ्हाडी वाजंत्री’ या चित्रपटाचा दिमाखदार भव्य प्रीमियर शो मुंबईतील सिटीलाईट चित्रपटगृहात बॅण्डबाजाच्या ठेक्यावर तालासुरात पार पडला. वऱ्हाडी वाजंत्र्यांच्या स्वागतासाठी खास बॅण्ड पथक सज्ज होते. त्यांच्या सुरावटीत तल्लीन होऊन उपस्थित सगळ्याच कलाकारांनी अनोखा ताल धरत नवचैतन्य निर्माण केले. ''वऱ्हाडी वाजंत्री''चा हा भव्य सोहळा पाहताना मुंबईकर रसिक प्रेक्षकांचे भान हरपून गेले होते. चित्रपटगृहात प्रवेश करण्यापूर्वी कलाकारांच्या बहारदार नृत्याने चित्रपटगृहाचा परिसर दणाणून गेला होता. अभिनेता विजय कदम, प्रिया बेर्डे, जयवंत वाडकर, पॅडी उर्फ पंढरीनाथ कांबळे, सुनील गोडबोले, पूर्णिमा अहिरे-केंडे, आनंदा कारेकर, प्रभाकर मोरे, शिवाजी रेडेकर, शीतल कलाहपुरे, साक्षी परांजपे, दिग्दर्शक विजय पाटकर, निर्माते कॅप्टन कल्पेश मगर, सहनिर्माते अतुल राजारामशेठ ओहोळ यांनी आदींनी सोहळ्याची रंगत वाढवली. जयवंत वाडकर यांच्या सौभाग्यवती विद्या यांनी ''वऱ्हाडी वाजंत्री''चे देखणे मुखपृष्ठ असलेला खास केक प्रीमिअरसाठी तयार केला होता.