मुलांसाठी विनामूल्य नेत्र तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलांसाठी विनामूल्य नेत्र तपासणी
मुलांसाठी विनामूल्य नेत्र तपासणी

मुलांसाठी विनामूल्य नेत्र तपासणी

sakal_logo
By

मुंबई ः श्री महावीर जैन हॉस्पिटलतर्फे मुलांसाठी १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी विनामूल्य नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. श्रुती मित्तल यांच्या नेत्तृत्त्वाखालील वैद्यकीय तज्ज्ञांच्या चमूच्या माध्यमातून हे शिबिर पार पडणार आहे. या शिबिरातील चिकित्सेनंतर १४ वर्षे वयाखालील मुलांवर विनामूल्य नेत्रशस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. याबद्दल जितो एज्‍युकेशनल अँड मेडिकल ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त महेंद्र जैन यांनी सांगितले, की ‘मुलांमधील दृष्टिदोष ही एक गंभीर समस्या असून त्यामुळे त्यांच्या एकूण सामाजिक आणि मनोवैज्ञानिक वाढीवर गंभीर परिणाम होतो. यंदाच्या बालदिनी या विशेष सामाजिक कार्याचे आयोजन करत गरजू मुलांना विनामूल्य तपासणी आणि शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. श्री महावीर जैन रुग्णालय नेत्रशस्त्रक्रिया आणि नेत्र निगा उपचारांसाठी ओळखले जाते. अत्यंत आधुनिक अशा प्रक्रिया आणि लेजर उपचारांच्या माध्यमातून रुग्णांना सर्वोत्तम असे उपचार मिळतील यासाठी रुग्णालय प्रयत्नशील असते.