पुलाच्या खाली पडून बाईकस्वाराचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुलाच्या खाली पडून बाईकस्वाराचा मृत्यू
पुलाच्या खाली पडून बाईकस्वाराचा मृत्यू

पुलाच्या खाली पडून बाईकस्वाराचा मृत्यू

sakal_logo
By

कासा, ता. १३ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तवानजीकच्या चामदरा ओहोळ पुलावरून खाली कोसळून एका बाईकस्वाराचा मृत्यू झाला.

गुजरात राज्यातून पुणे येथील महाविद्यालयामध्ये जाण्यासाठी निघालेल्या तरुणाला रस्त्यातच अपघाताला सामोरे जावे लागले. राजवीर सिंग संधू असे मयत तरुणाचे नाव आहे. भरधाव वेगात बाईक चालवणाऱ्या राजवीरला चामदरा नदीपुलाच्या आधी असलेल्या तीव्र वळणाचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो सरळ पुलाच्या खाली पडला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच परिसरात जलवाहिनीचे काम सुरू आहे. महामार्ग प्रशासन कासा पोलिस घटनास्थळी पोहचून क्रेनच्या साह्याने मृतदेह बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय कासा येथे पाठविण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.