कल्याणमधील आयमेथॉन स्पर्धा लक्षवेधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याणमधील आयमेथॉन स्पर्धा लक्षवेधी
कल्याणमधील आयमेथॉन स्पर्धा लक्षवेधी

कल्याणमधील आयमेथॉन स्पर्धा लक्षवेधी

sakal_logo
By

कल्याण, ता. १३ (बातमीदार) : मुंबईबाहेरील सर्वात मोठी अर्ध मॅरेथॉन ठरलेल्या कल्याणातील आयमेथॉनला स्पर्धकांनी तुफान प्रतिसाद दिला. इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण आणि कल्याण रनर्स ग्रुपच्या माध्यमातून याचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये देशाच्या विविध राज्यांसह आणि केनिया, नायजेरियासारख्या आफ्रिकन देशांतील धावपटूही सहभागी झाले होते. त्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी यापेक्षा मोठी मॅरेथॉन कल्याण-डोंबिवलीत आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्याप्रमाणे सर्व जण एकत्र आलो अगदी तसेच आपल्या कल्याण शहराच्या विकासासाठीही सर्वांनी एकजूट दाखवण्याचे आवाहन आयोजक डॉ. प्रशांत पाटील यांनी या वेळी केले.


स्पर्धेच्या माध्यमातून शाळेला मदत
या स्पर्धेच्या माध्यमातून मुरबाडमधील ग्रामीण भागातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर, केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, कल्याणचे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, केडीएमसी सचिव संजय जाधव, आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आर्थिक मदत करण्यात आली.

तब्बल साडेतीन हजार धावपटू सहभागी
या अर्ध मॅरेथॉनमध्ये मुंबई, कल्याण-डोंबिवलीसह हरियाना, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, मध्य प्रदेश, चंडीगड आदी राज्यांतील तब्बल साडेतीन हजार धावपटू सहभागी झाले होते. केनिया आणि नायजेरियाहून आलेले दोघे आंतरराष्ट्रीय धावपटू या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले.

मुंबईबाहेरील सर्वात मोठी अर्ध मॅरेथॉन
कल्याण पश्चिमेच्या दुर्गाडी चौकातून सुरू झालेली ही अर्ध मॅरेथॉन तीन किलोमीटर, पाच किलोमीटर, १० किलोमीटर आणि २१ किलोमीटर (हाफ मॅरेथॉन) अशा चार विभागांत (महिला - पुरुष) खेळवण्यात आली. या स्पर्धेचा आवाका लक्षात घेता मुंबईनंतर मुंबईबाहेरील ही सर्वात मोठी अर्ध मॅरेथॉन ठरली.