सायकल, दुचाकी चोर टोळी गजाआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायकल, दुचाकी चोर टोळी गजाआड
सायकल, दुचाकी चोर टोळी गजाआड

सायकल, दुचाकी चोर टोळी गजाआड

sakal_logo
By

मुंबई, ता. १३ : महागड्या सायकल आणि दुचाकी चोरणाऱ्या तीन चोरांच्या टोळक्याला गजाआड करण्यात कांदिवली पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत १६ सायकल, ३ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. नितीन मुळ्ये, राहुल पटेल, अक्षय गरूण अशी तिघांची नावे आहेत. हे तिघेही मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत फिरून तेथील दुचाकी आणि महागड्या सायकल हेरायचे. नंतर चोरी करून सायकली, दुचाकी मालवणी परिसरात मिळेल त्या किमतीत विक्री करायचे. या अटक केलेल्‍या तिघांविरुद्ध मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांत चोरीचे, मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत. चोरीच्या अनेक घटना परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीमध्येही कैद झाल्या आहेत. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.