मुंबईत नौदल कर्मचाऱ्याची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत नौदल कर्मचाऱ्याची आत्महत्या
मुंबईत नौदल कर्मचाऱ्याची आत्महत्या

मुंबईत नौदल कर्मचाऱ्याची आत्महत्या

sakal_logo
By

मुंबई, ता. १३ : भारतीय नौदलातील एका २५ वर्षीय कर्मचाऱ्याने सर्व्हिस रायफलद्वारे स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना कुलाब्यात शनिवारी (ता. १२) दुपारी घडली. याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. नौदल कर्मचाऱ्याने आत्महत्या केली तेव्हा तो जहाजावर तैनात होता. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. भारतीय नौदलाने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याबद्दल बोलताना नौदल अधिकाऱ्याने सांगितले, की ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांनी नौदल कर्मचारी त्याच्या शेजारी सर्व्हिस रायफल घेऊन मृतावस्थेत पडलेला दिसला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणाचा अधिक तपास कुलाबा पोलिसांमार्फत सुरू आहे.