महाराष्ट्राला ‘टीआयओएल’चा जुरी पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्राला ‘टीआयओएल’चा जुरी पुरस्कार
महाराष्ट्राला ‘टीआयओएल’चा जुरी पुरस्कार

महाराष्ट्राला ‘टीआयओएल’चा जुरी पुरस्कार

sakal_logo
By

नवी दिल्ली, ता. १३ : देशात विक्रमी करसंकलन करणाऱ्या महाराष्ट्राला ‘टॅक्स इंडिया ऑनलाईन (टीआयओएल)’चा जुरी (निवड समिती) पुरस्कार नुकताच येथे देण्यात आला.

नवी दिल्ली येथील एका पंचतारांकित हॉटेलात झालेल्या सोहळ्यात हा मानाचा पुरस्कार तमिळनाडूचे वित्तमंत्री पलानीवेल त्यागराजन यांच्या हस्ते देण्यात आला. जीएसटीचे विशेष आयुक्त अनिल भंडारी, संयुक्त आयुक्त जी. श्रीकांत, स्वाती काळे, संजय निकम यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मुंबई आणि पुणे विभागाला या वेळी सन्मानित करण्यात आले. या वेळी राज्यसभा खासदार सुशील मोदी, पंजाबचे माजी अर्थमंत्री मनप्रीत सिंह बादल, सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज ॲण्ड कस्टम्सच्या माजी अध्यक्ष प्रवीण महाजन आदी उपस्थित होते.
र्इज ऑफ डुर्इंग बिजनेसमध्ये महाराष्ट्राचा जीएसटी विभाग नेहमीच अग्रेसर राहिला आहे. महाराष्ट्रात कर परतावा प्रक्रिया नेहमी वेळेवर आणि जलदगतीने होते. व्यापाऱ्यांची नोंदणीही सुलभ आणि वेळच्या वेळी होत असल्याने व्यापाऱ्यांना दिलासा मिळतो. प्रामाणिक व्यापाऱ्याला महाराष्ट्र जीएसटी विभागातर्फे नेहमीच मदत केली जात असून योग्य सेवा जलदगतीने पुरवल्या जातात. बहुतांशी सर्व सेवा-सुविधा उदा. नोंदणी, दुरुस्त्या, करपरतावा आता ऑनलाईन झालेले आहे. महाराष्ट्र जीएसटी विभागात व्यापाऱ्यांसाठीच्या ऑनलार्इन तक्रार निवारण प्रणालीची ताबडतोब दखल घेतली जाते. महाराष्ट्र शासनाने अमलात आणलेली अभय योजना यशस्वी ठरली असून, एकूण दोन लाखांहून जास्त अर्ज निकाली काढण्यात आले.

महाराष्ट्र कर संकलनात आघाडीवर
----------------------
महाराष्ट्र कर संकलनाच्या बाबतीत नेहमीच पहिल्या क्रमांकावर आहे. मागील वित्तीय वर्षात महाराष्ट्राने देशाच्या एकूण करसंकलनाच्या १५ टक्के म्हणजे दोन लाख १८ हजार कोटी रुपये करभरणा केला. तसेच या आर्थिक वर्षात आतापर्यंत एक लाख ५५ हजार कोटी रुपये एवढे विक्रमी करसंकलन केले आहे.