७३ लाखाच्या साड्या पळवणाऱ्यांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

७३ लाखाच्या साड्या पळवणाऱ्यांना अटक
७३ लाखाच्या साड्या पळवणाऱ्यांना अटक

७३ लाखाच्या साड्या पळवणाऱ्यांना अटक

sakal_logo
By

भिवंडी, ता. १३ (बातमीदार) : शहरातील बाजारपेठ सिटी मार्केट येथील दुकानातून ७३ लाखांच्या साड्या व दुकानातील सामान परस्पर अपहार केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांच्याकडून एकूण ७३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांना भिवंडी न्यायालयात हजर केले असता १० दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

शहरातील बाजारपेठ नवी चाळ येथे सिटी मार्केट येथे श्री द्वारकादास साडी एम्पोरियम या नावाने शरद चंद्रकांत होळकर यांनी भागीदारीत दुकान सुरू केले होते. या व्यवसायामध्ये गुंतवणूक करून प्रभाकर दिगंबर कदम, रामराव दिगंबर कदम व भारत प्रकाशराव कदम यांना चालवण्यास दिले होते. त्यांनी १८ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास दुकानातील साड्यांसह इतर सामान अपहार करून पळून गेल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या दुकानाच्या आसपास लावलेल्या सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासून तिन्ही आरोपींना परभणी जिल्ह्यातील धर्मापुरी येथून अटक केली.