सायबर वेलनेस केंद्र लवकरच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायबर वेलनेस केंद्र लवकरच
सायबर वेलनेस केंद्र लवकरच

सायबर वेलनेस केंद्र लवकरच

sakal_logo
By

मुंबई, ता. १४ : गोव्याप्रमाणेच महाराष्ट्रातही लवकरच सायबर वेलनेस केंद्र सुरू करण्यासाठी राज्य सरकार अनुकूल आहे. ‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’च्या या प्रकल्पाला आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही महिला व बालकल्याणमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
सायबरविश्वात घडणारे गुन्हे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या पाहता देशभर अशी सायबर वेलनेस केंद्रे सुरू होण्याची गरज असल्याचेही लोढा म्हणाले.
चर्चगेट येथील आयएसी चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात शनिवारी (ता. १२) ‘रिस्पॉन्सिबल नेटिझमच्या दहाव्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम झाला. या वेळी लोढा यांच्या हस्ते सायबर इंडिया हेल्पलाईन आणि सायबर गुन्ह्यांविषयी माहिती देणाऱ्या मार्गदर्शनपर पुस्तिकेचे प्रकाशन झाले. या वेळी नेटिझमच्या संस्थापक सोनाली पाटणकर यांनी दहा वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. सायबर विश्वाचे आरोग्य चांगले राखण्याबरोबरच सायबर मानसशास्त्र आणि सायबर वेलनेस केंद्र या दोन आघाड्यांवरही आपल्याला काम करावे लागणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने सहकार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

भविष्यात सोशल मीडियापीडित लोकांसाठी रुग्णालय सुरू करण्याची वेळ येऊ द्यायची नसेल, तर आताच सायबर वेलनेसवर लक्ष द्यायला हवे. यासाठी असे केंद्र सुरू करून लोकांना त्वरित मदत, आधार आणि योग्य सल्ला मिळवून द्यायला हवा.
– मंगलप्रभात लोढा, महिला व बालकल्याणमंत्री