राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी प्रसाद चिकित्साची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी प्रसाद चिकित्साची  निवड
राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी प्रसाद चिकित्साची निवड

राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी प्रसाद चिकित्साची निवड

sakal_logo
By

वज्रेश्वरी, ता. १६ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी येथील गुरुदेव सिद्धपीठांतर्गत असलेल्या प्रसाद चिकित्सा या सेवाभावी संस्थेची यशदा पुणे आयोजित राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेसाठी निवड करण्यात आली आहे. शाश्‍‍वत गाव विकास प्रकल्पांतर्गत येथील प्रसाद चिकित्सा संस्थेतर्फे तानसा खोऱ्यातील जनता, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी यांच्यासाठी नियमित प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. दर वर्षी मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी यामध्ये सहभागी होत असतात. संस्थेचे या क्षेत्रातील योगदान व प्रावीण्य लक्षात घेऊन पालघर जिल्हा परिषदेने ८ ते १० नोव्हेंबरदरम्यान पार पडलेल्या राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रसाद चिकित्सा या संस्‍थेची निवड केली होती. हा प्रशिक्षण कार्यक्रम यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, यशदा पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.