तळोज्यातील प्रदूषणावर खारघरमध्ये रणनिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळोज्यातील प्रदूषणावर खारघरमध्ये रणनिती
तळोज्यातील प्रदूषणावर खारघरमध्ये रणनिती

तळोज्यातील प्रदूषणावर खारघरमध्ये रणनिती

sakal_logo
By

खारघर, ता. १४ (बातमीदार) : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कंपन्यांमधून रात्री सोडण्यात येणाऱ्या रसायनांच्या उग्र वासामुळे रहिवासी त्रस्त आहेत. याबाबत आदर्श सामाजिक संस्थेने लोकायुक्तांकडे तक्रार केली असली तरी प्रशासन मात्र या समस्येबाबत गंभीर नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता जनआंदोलनाची तयारी केली जात असून खारघर परिसरातील वसाहती आणि गावागावांमध्ये बैठकांमधून प्रदूषणाविषयी जनजागृतीचे प्रयत्न होत आहेत.
तळोजा औद्योगिक क्षेत्रात रात्री सोडण्यात येणाऱ्या रसायनांच्या उग्रवासामुळे तळोजा, खारघर, रोडपाली, कळंबोली आणि जवळपास असलेल्या गावांना त्रास होत आहे. याबाबतची तक्रार तळोजातील आदर्श सामाजिक संस्थेने राज्याच्या लोकायुक्तांकडे केली आहे. १८ नोव्हेंबरला याबाबतची सुनावणी देखील होणार आहे; पण एवढे करूनही प्रशासकीय यंत्रणा मात्र या समस्येकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसत आहे. शासनस्तरावर या समस्येबाबत कोणत्याही हालचाली होत नसल्याने आता आदर्श सामाजिक संस्थेने बैठकांमधून जनजागृतीवर भर दिला जात आहे. नुकतीच वसाहतीमधील कामधेनू गार्डेनिया सोसायटीत झालेल्या बैठकीतदेखील रात्रीच्या वेळी होणाऱ्या प्रदूषणाविरोधात आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. तसेच सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनीदेखील आंदोलनात सहभागी होण्याचे आश्वासन दिले आहे.
--------------------------------------
तळोजा औद्योगिक वसाहतीमधून सोडण्यात येणाऱ्या रसायनांविषयी लोकायुक्त कार्यालयात तक्रार देऊनही अधिकारी लक्ष देत नाही. त्यामुळे तळोजा वसाहत आणि परिसरातील गावात बैठका घेऊन केमिकलमुळे होणाऱ्या परिणामांविषयी जनजागृती केली जात आहे.
- राजीव सिन्हा, पदाधिकारी, आदर्श सामाजिक संस्था