अपूर्ण पादचारी पूल बनतोय डोकेदुखी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपूर्ण पादचारी पूल बनतोय डोकेदुखी
अपूर्ण पादचारी पूल बनतोय डोकेदुखी

अपूर्ण पादचारी पूल बनतोय डोकेदुखी

sakal_logo
By

गोरेगाव, ता. १४ (बातमीदार) : गोरेगाव पश्चिम येथील शास्त्रीनगर व मोतीलाल नगरला जोडणारा पादचारी पूल नूतनीकरणासाठी ११ ऑक्टोबर रोजी तोडण्यात आला होता. त्‍या वेळी काही दिवसांत नूतनीकरणाचे काम पूर्ण होणार, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र उद्यापही काम पूर्ण न झाल्‍याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. या ठिकाणी ‘नूतनीकरणासाठी तोडत आहोत’, असे महापालिकेच्या लोगोसहित बोर्ड लावलेले आहेत; परंतु नूतनीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. त्‍यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.