शिरसाड येथील कार्यकर्त्यांचा बविआमध्ये प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरसाड येथील कार्यकर्त्यांचा बविआमध्ये प्रवेश
शिरसाड येथील कार्यकर्त्यांचा बविआमध्ये प्रवेश

शिरसाड येथील कार्यकर्त्यांचा बविआमध्ये प्रवेश

sakal_logo
By

विरार, ता. १४ (बातमीदार) : शिरसाड आणि पालघर तालुक्यातील सावरे एंबुर विभागातील कार्यकर्ते, महिला आणि युवा कार्यकर्ते यांनी आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केला. या वेळी या प्रवेश कार्यक्रमासाठी वसई पंचायत समितीचे सभापती अशोक पाटील, वसई-विरार शहर महापालिकेचे माजी सभापती नीलेश देशमुख, माजी नगरसेविका जयश्री किणी, माजी उपसरपंच प्रणय कासार, अशोक पाटील, ॲड. नितीन भोईर, विशाल पाटील यांच्यासह बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.