समता फाउंडेशनतर्फे फॅशन शो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समता फाउंडेशनतर्फे फॅशन शो
समता फाउंडेशनतर्फे फॅशन शो

समता फाउंडेशनतर्फे फॅशन शो

sakal_logo
By

कासा, ता. १४ (बातमीदार) : येथील गोदावरी परुळेकर महाविद्यालयात फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. या शोचे उद्‌घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भगवानसिंग राजपूत यांनी केले. या वेळी राजपूत यांनी पुरुषोत्तम अग्रवाल यांनी केलेल्या स्तुत्य कार्याचे व समता फाऊंडेशनचे कौतुक केले. या वेळी ६० विद्यार्थी या शोमध्ये सहभागी झाले. विद्यार्थ्यांकडून विविध कपडे प्रदर्शनात मांडण्यात आले. या प्रदर्शनात सीमा पागी व समता फाऊंडेशनच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
परुळेकर महाविद्यालयात गेल्या चार वर्षांपासून समता फाऊंडेशनमार्फत टेलरिंग व फॅशन डिझायनिंग हा अभ्यासक्रम शिकवला जात आहे. आतापर्यंत ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला. यातील ४० गरजू विद्यार्थिनींना समता फाऊंडेशनमार्फत शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. या कोर्समुळे अनेक महिलांना रोजगार मिळाला असून आदिवासी भागात हा उपक्रम राबविणे महत्त्‍वाचे ठरले.