सम्राट अशोक विद्यालयात बालदिनानिमित्त कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सम्राट अशोक विद्यालयात बालदिनानिमित्त कार्यक्रम
सम्राट अशोक विद्यालयात बालदिनानिमित्त कार्यक्रम

सम्राट अशोक विद्यालयात बालदिनानिमित्त कार्यक्रम

sakal_logo
By

कल्याण, ता. १४ (बातमीदार) : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती कल्याण पूर्वमधील सम्राट अशोक विद्यालयात साजरी करण्यात आली. बालदिनाचे औचित्य साधत या शाळेतील विद्यार्थ्यांनी भविष्यात दारू, सिगारेट, गुटखासारख्या मादक पदार्थांचे सेवन करणार नाही, अशी शपथ घेत व्‍यसनी पदार्थांचे हवन केले.
लहान वयात मुलांना योग्य मार्गदर्शन मिळाले, तरच ते भविष्यात आदर्श नागरिक होऊ शकतात. या विचाराने पंडित नेहरूंनी मुलांसाठी अनेक योजना आखल्या. आपल्या गुणी स्वभावामुळे चाचा नेहरू लहान मुलांना आपलेसे वाटायचे म्हणून १४ नोव्हेंबरला त्‍यांच्‍या जन्मदिनी आदरांजली म्हणून बालदिन साजरा केला जातो.
कल्याण पूर्वमधील सम्राट अशोक विद्यालयात विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम सांगून दारू, सिगारेट, गुटखा अशा मादक पदार्थांचे सेवन भविष्यात करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही, अशी शपथ उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी घेतली. कार्यक्रमप्रसंगी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुजाता नलावडे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.