शैक्षणिक संकेतस्थळाचा सर्वांना उपयोग होईल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शैक्षणिक संकेतस्थळाचा सर्वांना उपयोग होईल
शैक्षणिक संकेतस्थळाचा सर्वांना उपयोग होईल

शैक्षणिक संकेतस्थळाचा सर्वांना उपयोग होईल

sakal_logo
By

मुलुंड, ता. १४ (बातमीदार) ः सिद्धिविनायक शिक्षण संस्थेने विद्यार्थी पालकांना शैक्षणिक मदत करणारे, मार्गदर्शन करणारे ‘संकेतस्थळ’ उपलब्ध करून दिल्याने सर्वांना त्‍याचा फायदा होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे. भांडुप येथील सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाच्या sspmeducation.com या संकेतस्थळाच्‍या उद्‌घाटन व लोकार्पणावेळी मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी खासदार राहुल शेवाळे, खासदार गजानन कीर्तिकर, आमदार सदा सरवणकर, माजी खासदार आनंदराव अडसूळ आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षणतज्ज्ञ रमेश खानविलकर यांनी सन १९९५ मध्ये स्थापन केलेल्या सिद्धिविनायक शिक्षण संस्थेमध्ये राजाराम शेठ विद्यालय सिद्धिविनायक इंग्लिश मीडियम स्कूल, कनिष्ठ कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ अभ्यासक्रम, मुला-मुलींचे वसतिगृह, अनेक अभ्यास केंद्रांचे भव्य असे शैक्षणिक संकुल तयार झालेले आहे. त्याचा लाभ महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थांना होत आहे. संचालक रिद्धेश खानविलकर यांनी संस्थेच्या सर्व अभ्यासक्रम, शैक्षणिक उपक्रम, महाविद्यालये, शाळा, वसतिगृह व इतर सर्व तऱ्हेची शैक्षणिक माहिती प्रवेशाच्या वेळी उपलब्ध व्हावी, म्हणून संकेतस्थळ विकसित केले आहे. या प्रसंगी खानविलकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना संस्थेने २८ वर्षांत केलेल्‍या कामांची माहिती दिली. तसेच शिंदे यांचा संस्थेच्या वतीने शाल, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.